माझा बेकिंग प्रवास -3 वॅनिला कप केक अंड्यासहित

3- वॅनिला कप केक (अंड्याचा )

बऱ्याच जणांना अंडी चालत नाहीत , म्हणजे काही शाकाहारी असतात म्हणून तर काहींना पचत  नाही किंवा आवडत नाही म्हणून ..म्हणून मी आधीच अंड्याशिवाय वॅनिला  कप्स ची रेसिपी आधी दिली , मला जेव्हा केक्सच्या पार्टी ऑर्डर्स येतात तेव्हा सुद्धा अंड्याविना केक्सच्याच जास्त असतात कारण सगळा मिक्स क्राउड असतो ना .. तर आता मात्र मी अंड्यासहित केक ची रेसिपी सांगतेय , मला पर्सनली अंड्याचे केक्स चवीला जास्त आवडतात पण एगलेस केक ची जी रेसिपी मी शेअर केलीय तीही उत्तम आहे .
एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बेक करताना सगळे  जिन्नस रूम टेम्परेचर च्या असाव्यात , मी मैदा आणून फ्रिजमध्ये ठेवते , कारण मुंबईच्या हवेत त्यात अळ्या पडतात .बटर ,दूध ,अंडीसुद्धा फ्रिजमध्येच असतात नाही का ? तेव्हा या वस्तू फ्रिजबाहेर ठेवणे महत्वाचे !
थोडक्यात प्लॅनिंग महत्वाचं !
तर आता रेसिपी , साधारण १२ कप  केक्स तयार होतात 
साहित्य 
मैदा २०० gms 
बेकिंग पावडर 1/2 tsp (bipi)
चिमूटभर मीठ 
अंडी
कॅस्टर शुगर किंवा दळलेली साखर १६० gms 
दूध ६५ मिली 
बटर ११५ gms (मी अमूल बटर वापरले तेव्हा वेगळे मीठ ऍड करायची गरज नाही )
वॅनिला  इसेन्स 1 1/2tsp 
कृती 
1.मैदा (बीपी)आणि मीठ दोनदा चाळून  घेणे ह्यामुळे केक हलका होतो , अमूल बटर घेणार असाल तर मीठ नको , हे झालं ड्राय मिश्रण . ओव्हन १६० डिग्री वर प्रीहीट साठी ऑन  करावा , प्रीहीट साठी 10 मिनिट अवधी महत्वाचा आहे 
.साखर आणि बटर व्हिस्क करणे , हॅन्ड बिटर असल्यास उत्तम नाहीतर हाताला भरपूर व्यायाम होतो 
3.आता एकेक अंड टाकून फेटून घेणे हे झाले वेट मिश्रण तयार 
.वेट मिश्रणात ड्राय मिश्रण हळूहळू घालून ते स्पॅट्युलाने एकजीव करणे .हे हळुवार करणे कारण आता मिश्रणातले बीपी , अंडी यांची रिअक्शन होऊन जाळी तयार  होत असते , मिश्रण फुगतही असतं ते बसता कामा नये , हे करत असताना दूधही घालावे म्हणजे मिश्रण नीट एकजीव होऊन पळीवाढं होतं , याला इंग्लिशमध्ये रिबन कन्सिस्टंसी म्हणतात  
5.आता कप केक टिनमध्ये कपकेक लायनर्स लावून त्यात अर्धा कप  किंवा थोडं  त्याहुन जास्त केकचं मिश्रण घालावं , मोकळी जागा केक फुलण्यासाठी आवश्यक आहे 
वर फॉईल पेपरची डोम शेप छत्री मी ठेवते म्हणजे केक चा  टॉप जास्त बेक होत नाही 
१२ -१५ मिनटं बेक कराव 
मी ओटीजी बंद करून टिन - मिनिटं  तसाच आत ठेवते मग बाहेर काढून कप केक्स वायर रॅक वर ठेवते 
हे नुसते खायला छान लागतात किंवा वर बटर क्रीम किंवा चॉकोलेट गनाश चं  टॉपिंग करून सजवता येतात आणि खरं  सांगू कप केक सजवण्याचे असंख्य प्रकार आहेत तेही सांगेन हळूहळू 
रेसिपी ट्राय केलीत तर नक्की सांगा 
आणि हो प्रतिक्रिया सुद्धा पाठवा , उत्तम प्रतिक्रिया पाठवणाऱ्या एका वाचकाला डेझर्टफुली युअर्स तर्फे इंटरेस्टिंग भेट 

Comments

Popular posts from this blog

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

८- माझा बेकिंग प्रवास

७-माझा बेकिंग प्रवास