5- माझा बेकिंग प्रवास
एगलेस  वॅनिला केक 

चॉको वॅनिला केक विथ एग 
..एग आणि एगलेस केक लढाई !!

 अंड एक बाइंडिंग एजन्ट आहे .. केक किंवा कुकीज करताना याचा सर्रास वापर होतो .. पण गेल्या काही वर्षांपासून मी बघतेय अंड्याविना केक ची मागणी वाढलेली दिसली , हेल्थ म्हणा , विगन झाल्याने म्हणा किंवा मुळातच शाकाहारी म्हणून म्हणा पण एगलेस केकस  ची पसंती वाढली 
त्यामुळे अंड्याला पर्याय शोधले गेले , आधी दही हा पर्याय होताच त्याशिवाय काही फ़ळं उदा. केळी , ऍपल  सॉस ( सफरचंद उकडून ते मॅश करून घेणे ), बटाटा स्टार्च , फ्लॅक्स मिल म्हणजे अळशी पावडर करून पाण्यात कालवून तयार होणारा बलक .
अंड्याच्या बाबतीत बोलायचं तर त्याच पांढरा  आणि पिवळा बलक दोन्हीचा उपयोग वेग वेगळा होऊ शकतो पण एकत्र ते एका टीमप्रमाणे काम करतात , एग व्हाईट लिव्हनर ( आंबवण ) म्हणून उदा . रॉयल आयसिंग चा एक घटक , मार्शमेलो चा बेस,शिवाय मेरँग चा अत्यावश्यक घटक आहे , तो कोणत्याही बेक्ड पदार्थाला हलकेपणा आणि चव देतो  तर पिवळा बलक पदार्थाला रंग आणतो आणि घट्टपणा देतो 
अंड  शिजलं कि नाही का ते घट्ट होत .. तसंच  बेकिंग मध्ये ते केक कुकीज आणि कस्टर्डला दाटपणा आणत, दाटपणा जास्त हवा असेल तर पिवळा बलक  जास्त घातला जातो , केकच्या मिश्रणात किंवा पिठात अंड  घातलं कि केक , कुकीज ,कस्टर्ड , आईस्क्रिम आणि चीजकेकच्या रचनेला बंधन मिळतं .
पण आता अंड  नको मग काय करायचं ? अंड्याऐवजयी काय वापरायचं ?
एका अंडयाला पर्याय म्हणून 
ऍपल सॉस / कप (८५ gms )
दही / कप (६० gms )
कुस्करलेलं केळं 1/2
तेल / कप (६० gms )
हे पर्याय अगदी बेमालूमपणे अंडयाची जागा एगलेस बेकिंग मध्ये घेतात .मला स्वतःला एग वाला केक आणि एगलेस केक मध्ये फार काही फरक जाणवत नाही , मी दही किंवा दुधात व्हिनेगर घालून एगलेस केक्स बनवते आणि माझ्या क्लायेंटस ना ते आवडतात 
लढाई संपली ☺️
Comments

Popular posts from this blog

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

८- माझा बेकिंग प्रवास

७-माझा बेकिंग प्रवास