6- माझा बेकिंग प्रवास ..

चॉकोलेट केकचा शोध ...आणि चॉकोलेट केक रेसिपी 

चॉकोलेट केक चा इतिहास बघितला ना तर १७६४ मध्ये जायला हवं ..जेव्हा डॉ . जेम्स बेकर  यांनी मोठ्या जात्यामध्ये कोको बीन  दळून चॉकोलेट तयार  केलं ,

IMG_8269.jpeg
त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १८२८ साली कोनार्ड  वॅन  हौटेन यांनी कोको बटर आणि काकाओ  किंवा पावडर अशा रूपात ते निर्माण केलं 

c-j-van-houten-150x150.jpeg

तर सिल्की आणि मुलायम  चॉकोलेट बनवायची कृती शोधली रोडॉल्फ लिंड्ट यांनी १८७९ मध्ये ज्यामुळे केकमध्ये चॉकोलेट वापरणं सोपं गेलं ! पण त्याचा वापर अजूनही फिलिंग साठी किंवा ग्लेझ म्हणून होत होता
rodolphe-lindt.jpegआणि १८८६ मध्ये काही अमेरिकन कुक्सनी चॉकोलेट , केक मध्ये वापरायला सुरुवात केली आणि डेविल्स चॉकोलेट केक मिक्स १९३० च्या मध्यावर अमेरिकेत मिळायला लागली .पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ती थांबवण्यात आली .
१९८० च्या सुमारास चॉकोलेट डिकॅडन्स केक्स खूप पाप्युलर झाले, आणि सिंगल सर्विंग मोल्टन चॉकोलेट केक ज्यात मध्यभागी प्रवाही चॉकोलेट असे आणि काही विलक्षण स्वाद जसे चहा,लाल मिरची ,पॅशन फ्रुट , शॅम्पेन . खूप पॉप्युलर होते 
२००० मध्ये आर्टिसनल केक लोकप्रिय झाले ,आणि नंतर फ्लावरलेस म्हणजे पीठाशिवाय केक हा एक नवा प्रकार अस्तित्वात आला .. 
चॉकलेटच्या अनेक गमती जमती आहेत त्या पुन्हा केव्हातरी ... आता रेसिपि 
Chocolate Sponge Cake Recipe
साहित्य 
 • 228 grams बटर ( मी अमूल बटर वापरते त्यामुळे वेगळं मीठ ऍड करत नाही )
 • 250 grams साखर 
 • 227 grams मैदा 
 • 50 grams कोको पावडर  (Dutch Processed)
 • 4 अंडी 
 • 2 ts बेकिंग पावडर
 • 120 ml दूध 
 • 2 tsp वॅनिला  इसेन्स 
 • कृती 
 • ओव्हन १६० डिग्री वर प्रीहीट ला लावा 
 • मैदा , बेक पावडर,कोको पावडर , चाळून घेणे 
 • बटर आणि साखर हॅन्ड बीटर ने छान बीट  करून घेणे म्हणजे ते हलकं आणि फिक्या रंगाचं होईल 
 • त्यात एक एक अंड  घालून तेही नीट मिक्स करून घेणे 
 • आता मैदा आणि दूध , तीनच्या  बॅच मध्ये म्हणजे. मैदा दूध , मैदा दूध असं घालत जाणे मिश्रण एकसारखं करून घेणे 
 • शेवटी वाणीला घालणे 
 • जास्त घट्ट वाटल्यास थोडं दूध घालणे 
 • पॅन  मध्ये घालून ३०-३५ मिनटं  बेक करणे , पण मी साधारण २५ व्या मिनिटाला  चेक करते 
 • कारण हे टाईमिंग ओव्हन नुसार बदलतं 
 • नंतर बाहेर  काढून पॅन  मधेच 10 मिनिट ठेवते 
 • मग रॅक वर पॅन  उलटा  करून केक पूर्ण तहान होऊ देणं 


Comments

Popular posts from this blog

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

८- माझा बेकिंग प्रवास

७-माझा बेकिंग प्रवास