माझा बेकिंग प्रवास -2 साधे वॅनिला कप केक
2-साधे कप केक
मला तर ओव्हन ची साधी ओळख सुद्धा नव्हती , घरी फक्त गॅस , स्टोव्ह किंवा कोळशाची शेगडी बघितली होती
केक म्हणजे काहीतरी महागडं किंवा श्रीमंती खाणं ही मनाची समजूत .. त्यामुळे ओव्हन शी दुरूनही संबंध नव्हता .... हो पण मायक्रोवेव्ह मात्र होता पण त्यात बेकिंग विशेषतः व्यावसायिक बेकिंग होऊ शकत नाही हे शिकत असताना कळलं , घेतला ५२ लिटर मॉर्फी रिचर्ड चा ओटीजी ..
त्याच्याशी मैत्री करणं आलं ,कधी नरम तर कधी गरम अशी अवस्था , नेमकं केक टिन काढताना मिटन्स ( हॅन्ड ग्लोव्ह ) सापडायचे नाहीत मग काय विचारता दोन्ही हातांवर असंख्य भाजल्याच्या खुणा ...पण जिद्द सोडली नाही . ओव्हन समजायला लागला !
आता शेअर करते साध्या वॅनिला कप केक ची रेसिपी
यात ८-१० कप्स तयार होतात
साहित्य
मैदा १४० gms
दळलेली साखर १०० gms
बेकिंग पावडर 1/2 tsp (बीपी )
बेकिंग सोडा 1/2 tsp)(बीएस )
मीठ १/४ tsp
रिफाईंड तेल ४० मिली ( मी सफोला टोटल वापरते )
दूध 1/2 कप
व्हिनेगर 1 tsp
व्हॅनिला इसेन्स 1 tsp
Method:
1.मैद्यात बीपी ,बीएस आणि मीठ घालून दोनवेळा चाळून घेणे याने केकला हलकेपणा येतो हे आहे ड्राय मिश्रण , आता ओव्हन प्रीहीट साठी 170 डिग्रीवर 10 मिनिट ऑन करावा
२.दुधात व्हिनेगर आणि वॅनिला इसेन्स घालून बाजूला ठेवणे
३.दळलेली साखर आणि तेल हॅन्ड बिटरने व्यवस्थित व्हिस्क करून घेणे म्हणजे दोन्ही एकजीव होईल , हॅन्ड बिटर नसल्यास व्हिस्कने सुद्धा करता येत पण जरा जास्त वेळ लागतो आणि हातालाही कष्ट पडतात
आता यात दूध वॅनिला आणि व्हिनेगरचे मिश्रण घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे , हे याच स्टेजला करावे कारण एकदा का मैदा घातला कि जास्त मिक्सिन्ग करता येत नाही .. हे झाले वेट मिश्रण
४.आता हळू हळू या वेट मिश्रणात ड्राय मिश्रण टप्प्याटप्याने टाकत जात स्पॅट्युलाने मिक्स करत जावे
केक मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात २-३ tbsp दूध घालावे म्हणजे मिश्रण पळीवाढं असावं
5.कप केक टिनमध्ये कपकेक लाइनर्स ठेऊन प्रत्येक कप अर्धा भरावा , वर फॉईल पेपरची डोम शेप छत्री मी ठेवते म्हणजे केक चा टॉप जास्त बेक होत नाही
१२ -१५ मिनटं बेक कराव
मी ओटीजी बंद करून टिन ४-५ मिनिटं तसाच आत ठेवते मग बाहेर काढून कप केक्स वायर रॅक वर ठेवते
हे नुसते खायला छान लागतात किंवा वर बटर क्रीम किंवा चॉकोलेट गनाश चं टॉपिंग करून सजवता येतात आणि खरं सांगू कप केक सजवण्याचे असंख्य प्रकार आहेत तेही सांगेन हळूहळू
रेसिपी ट्राय केलीत तर नक्की सांगा
Comments
Post a Comment