४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

  - माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक 

Cocoa vs. Chocolate
चॉकोलेट केक जेव्हा करायला घेतला तेव्हा कोको आणि चॉकोलेट यात काय फरक आहे हे माहित नव्हतं ..मॉन्जिनीस मधून केक आणायचा तोही ब्लॅक फॉरेस्ट किंवा चॉकोलेट केक इतकंच माहित होत ..नंतर इतर अनेक केक शॉप्स उघडली गेली 
आता जेव्हा प्रत्यक्ष केक केला  तेव्हा कोको आणि चॉकोलेट यातला फरक आपल्याला माहित असायला हवा हे जाणवलं , माहिती मिळाली ती अशी ..
कॅको झाडापासून कोको आणि चॉकोलेट हे दोन बाय प्रॉडक्ट्स मिळतात .
ज्यापासून चॉकोलेट मिळत त्या झाडाच बोटॅनिकल नाव आहे थिओब्रोमा काकाओ (theobroma cacao )
काकाओ (cacao )आणि कोको मधला महत्वाचा फरक म्हणजे काकाओ हि कोणतीही प्रक्रिया झालेली कोको बीन आणि कोकाआ (cocoa ) म्हणजे बीन वर प्रक्रिया झालेली पावडर किंवा चॉकोलेट !
मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या ट्रॉपिकल जंगलात कोकोच्या जवळजवळ २० प्रजाती सापडतात आणि त्यात थिओब्रोमा सर्वोत्तम प्रजाती मानली जाते आणि हे नाव ग्रीक भाषेतून घेतलं गेलं आहे ज्यात थिओस म्हणजे देव आणि ब्रोमा म्हणजे अन्न , थोडक्यात देवाचं अन्न !! म्हणूनच थिओब्रोमा ,कोको प्रजातीतील सर्वोत्तम कोको मानला जातो
आता  कोको आणि चॉकोलेट मधला फरक मला समजला तो असा ..
1.कॅको बीन्स वर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून निघालेले कोको आणि चॉकोलेट हे दोन वेगळे पदार्थ आहेत , त्यासाठी कॅको बीन आंबवून , भाजून तिला सोलून मग ती दळली जाते 
2. कोको आणि चॉकोलेट मधला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे त्यात असणारं  किंवा नसणारं कोको बटर , कोको मध्ये ते ते फारच थोडं वा अगदीच नसतं .त्याच्या विरुद्ध चॉकोलेट मध्ये कोको बटर असतं 
3.कोको किंवा चॉकोलेट मध्ये कोको बटर ची मात्रा  किती आहे यावर त्यांच पोषक मूल्य ठरतं , कोको पावडरमध्ये कोको बटर जवळ जवळ नसल्यानेच ते अतिशय आरोग्यदायी पेय मानलं जातं कारण त्यात साखर आणि फॅट ची मात्रा खूपच कमी आहे , कोको मध्ये अँटिऑक्सिडं भरपूर असतात 
4. याउलट चॉकोलेट मध्ये कोको बटर आहे. ज्यात साखर आणि फॅट्स ची मात्रा जास्त आहे , कोकोच्या  तुलनेत यातही अँटिऑक्सिडंट्स आहेत पण मात्रा कमी आहे 
5.कोको नेहेमी पावडर च्या रूपात दिसते आणि वापरली जाते . चवीला ती सहसा कडू आणि गडद रंगात आढळते , म्हणूनच तिची वर्गवारी डच ( एक प्रक्रिया ज्यामुळे पावडर हलकी होते आणि कडवटपणा कमी होतो ) किंवा नैसर्गिक अशी होते. तर चॉकोलेट अनेक प्रकारात मिळतं - पावडर,द्रवरूपात,छोटे बॉल्स ,बार्स ,.याशिवाय त्यांची अनेक रूपात वर्गवारी होते -अगोड किंवा अनस्वीटंड , डार्क ,व्हाईट , स्वीट , सेमिस्वीट ,कंपाउंड आणि रॉ (कच्च्या रूपात )
6. त्यांची नावं त्यांच्या  रंगाशी निगडित आहेत ,कोको नावाप्रमाणे लालसर चोकोलेटी तर चॉकोलेट मध्यम  ते गडद चोकोलेटी असतं 
7.Nahuatl (नाहुआट्ल ) या स्पॅनिश शब्दापासून किंवा अझ्टेक शब्दापासून त्यांची व्युत्पत्ती झाली आहे . स्पॅनिश काकाओ (cacao ) पासून कोकाआ (cocoa) तर चॉकोलेट हा नाहुआट्ल शब्द xocolatl (चोकोलॅटल ) स्पॅनिशभाषेने अंगिकारला ज्याचा शब्दशः अर्थ आहे कडू पेय !
आज इथेच थांबते , हि सगळी गुगलवर मिळाली पण ती मराठीत नाही म्हणून हि धडपड !!
पुढच्या ब्लॉगमध्ये चॉकलेट केकची रेसिपी अपलोड करेन 
हा ब्लॉग कसा वाटला ?
कोको बिन्स
चॉकलेट पावडर
साध्या कोको पावडरचा केक / डच कोको पावडरचा केक

Comments

Popular posts from this blog

८- माझा बेकिंग प्रवास

७-माझा बेकिंग प्रवास