७-माझा बेकिंग प्रवास

- माझा बेकिंग प्रवास 

जर्मन चॉकोलेट केक 

चॉकलेट केकचे अनेक प्रकार आहेत उदा. मूस चॉकोलेट , ब्लॅक फॉरेस्ट , चॉकोलेट ट्रफल केक आणि यात एक प्रकार म्हणजे जर्मन चॉकोलेट केक , आता या नावामुळे हा केक मूळचा जर्मनीचा आहे असं वाटत ना ?पण हा आहे अमेरिकेचा आणि इंग्लिश अमेरिकन चॉकोलेट मेकर सॅम्युअल जर्मन ने बेकर्स चॉकोलेट कंपनीसाठी डार्क बेकिंग चॉकोलेट तयार केलं जे केक मध्ये वापरलं जातं , त्याच्या सन्मानार्थ या प्रोडक्ट ला बेकर्स जर्मन स्वीट चॉकोलेट हे नाव  दिलं  गेलं नावावर या केकचं  नाव पडलं आणि 3 जून १९५७ ला अमेरिकेच्या दलास मॉर्निंग न्यूज मध्ये रेसिपी ऑफ डे  म्हणून जर्मन्स चॉकोलेट केक ची रेसिपी आली .जी खूप लोकप्रिय झाली अनेक वृत्तपत्रांत  छापून आली , ज्यामुळे कंपनीचा सेल ७३ वाढला आणि अमेरिकन्स च्या रोजच्या आहारातील तो एक खास पदार्थच झाला आणि मग जर्मन्स मधला   काढला जाऊन जर्मन केक झाला आणि त्यामुळेच हा केक मूळचा जर्मनीचा आहे हि धारणा बनली .. जी चुकीची आहे .११ जून जर्मन चॉकोलेट डे  म्हणून अमेरिकेत साजरा केला जातो 
मी स्वतः अजून हा केक बनवला नाही पण याची रेसिपी नक्की शेअर करते 
चॉकोलेट केक आणि जर्मन चॉकोलेट केक मध्ये फारसा फरक नाही 
चॉकोलेट केक  मध्ये फिलिंग ,टॉप आणि बाहेरून सुद्धा चॉकोलेटच असत तर जर्मन केक मध्ये चॉकोलेट केकमध्ये कॅरॅमल फ्लेवर आयसिन्ग असतं  आणि हा केक ओपन असतो जेणेकरून ह्या लेयर्स आपल्यला दिसू शकतात , आणि हा केक थोडा जास्त गोड  असतो , याशिवाय केकमध्ये क्रंच ऍड करण्यासाठी पीकन चा किंवा कॅरेमलायाझ केलेली फळं  जसे स्ट्रॉबेरी . ऍड करतात , केक च्या मिश्रणात किंवा फिलिंग मध्ये किसलेलं सुकं  खोबरंही असतं 
आणि हो या केकची 3 टप्प्यात वर्गवारी होते 
केक 
फिलिंग 
अझेम्बलिंग ( रचना )

केकचं  साहित्य 
साखर कप 
कोको पावडर / कप 
बेकिंग पावडर 1 अँड 1/2 tsp 
मीठ 1 tsp 
अंडी  
बटरमिल्क 1 कप 
तेल ( रिफाईंड )/ कप 
वॅनिला tsp 
उकळतं  पाणी 1 कप 

कोकोनट फ्रॉस्टिंग साठी साहित्य 

लाईट ब्राऊन शुगर 1/2 कप 
साखर 1/2 कप 
अंड्याचा पिवळा बल्क 3
इवॅपोरेटेड मिल्क / कप 
वॅनिला  इसेन्स 1 tbs
पीकन बारीक तुकडे 1 कप 
सुक्या खोबऱ्याचा किस थोडा गोड  केलेला 1 कप 

चॉकोलेट फ्रॉस्टिंग साठी साहित्य 
बटर 1 कप 
कोको पावडर / कप 
पावडर शुगर 3 कप 
इवॅपोरेटेड मिल्क / कप 
वॅनिला एक्सट्रॅकट 1 tsp 

कृती 
केक १९० c ला प्रीहीट साठी लावा 

केक 
साखर मैदा कोको पावडर बेकिंग सोडा मीठ चाळून घेणे हे ड्राय मिश्रण 
दुसऱ्या बोलमध्ये अंडी , बटरमिल्क  तेल आणि वॅनिला  घालून छान  मिक्स करून घेणे , हे वेट मिश्रण 
आता ड्राय आणि वेट मिश्रण एकत्र करून त्यात उकळतं  पाणी घालणे , हे केक बॅटर जरा पातळच असतं 
बेकिंग पॅन  मध्ये घालून २५-३५ मिनिटं  बेक करणे , 5 मिनिट पॅन  मधेच केक थंड होऊ देण

आता कोकोनट फ्रॉस्टिंग ची तयारी 
एका सॉस पॅनमध्ये दोन्ही साखर बटर , अंड्याचे पिवळे बलक आणि इवॅपोरेटेड मिल्क घालून मध्यम  आचेवर उकळी येऊ देणे , सतत ढवळत राहणे , थोड्यावेळाने ते दाट  होईल
गॅस बंद करून त्यात वॅनिला  पिकन नट्स आणि खोबऱ्याचा किस घालून थंड होऊ देणे 

चॉकोलेट फ्रॉस्टिंग
बटर वितळवून घेणे त्यात कोको पावडर आणि दूध घालून ते पसरवता  येईल असे बनवावे , वॅनिला  घालणे 

आता केकची रचना

दोन केकच्या चार चकत्या कापून , एकमेकांवर रचण्याआधी त्यावर मध्यावर चॉकोलेट फीलिन्ग घालून त्याच्याबाजूने कोकोनट फिलिंग घालावे 
अशारितीने सगळ्या चकत्या रचून सर्वात वरच्या चकतीवर मध्यभागी कोकोनट फिलिंग घालून बाजूने चॉकोलेट फिलिंग रचावे 
मला हि रेसिपी अतिशय इंटरेस्टिंग वाटली आहे 
सध्यातरी केकचा फोटो सॅलीझ बेकिंग ऍडिक्शन च्या साईटवरून घेतला आहे


२७-०२-२०१९ 

Comments

Popular posts from this blog

८- माझा बेकिंग प्रवास

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक