८- माझा बेकिंग प्रवास

- माझा बेकिंग प्रवास 
कपकेक आणि मफिन !!
१७९६ च्या सुमारास ,एक हलका फुलका केक जो कपात बेक होतो तो कपकेक असं वर्णन केलं गेलं आहे
19 व्या शतकाच्या पूर्वार्धात कपकेक या शब्दाचा वापर दोन वेगळया अर्थाने होत असे , पहिला म्हणजे ...मफिन टिन  अतित्वात येण्याआधी प्रत्येक केक छोट्या मातीच्या भांड्यात ,रेमकीन्स किंवा मोल्ड मध्ये बनत आणि त्या कपांमुळे त्यांचं नाव कपकेक पडलं , आणि ते रूढ झालं 
इंग्लिश कपकेक , अमेरिकन कपकेकच्या तुलनेत लहान असतात आणि त्याच्यावर आयसींग किंवा टॉपिंग क्वचितच असत 
आणि दुसरा अर्थ म्हणजे असे केक ज्यांचं साहित्य आकारमानात मोजलं जात थोडक्यात वजन वापरता स्टॅण्डर्ड कप वापरून ! आणि पुढल्या काही वर्षात घराघरात हे माध्यम लोकप्रिय झालं , आणि १२३४ केक्स म्हणून ओळखलं जाऊ लागलं , कारण त्यात वस्तूच असत , 1 कप बटर , कप साखर , 3 कप मैदा आणि अंडी ! हे साधे यल्लो केक असत आणि पाउंड  केकपेक्षा थोडे स्वस्त कारण अंडी आणि बटर यांचं प्रमाण यात अर्ध असे 
आणि म्हणूनच आकारमानानुसार मापं वापरली जातात तो कपकेक आणि वजनानुसार साहित्य वापरलं जात म्हणून पाउंड  केक 
सुरुवातीच्या काळात कपकेक्स जड पॉटरी कप मध्ये बेक होत असत ,अजूनही अनेक बेकर्स रामेकींस , छोटे कॉफी मग , मोठे टी  कप किंवा लहान ओव्हन प्रूफ पॉटरी  डिश मधेही केक्स बेक करतात 
आता कपकेक्स मफिन टिनमध्ये बेक होतात जे धातूचे असतात जे नॉनस्टिक किंवा साधे असतात आणि किंवा १२ खाचे किंवा कप्स त्यात असतात 
स्टॅंडर्ड साईझ चा कप 3 इंच रुंदीला आणि साधारण ११० gms वजनाला भरतो , आता तर मिनी , जम्बो अशा आकारातही कपकेक  बनतात 
या टिन्समध्ये कपकेक लायनर लावले जातात जे पातळ कागदाचे कपच्या आकारात बनवलेले असतात यामुळे कप्स मऊ राहतात आणि टिन स्वच्छ राहतो आणि सर्वींगसाठी सुद्धा सोपे पडतात . हे लायनर्स सुद्धा अनेक आकारप्रकारात मिळतात 
आता सर्वात महत्वाचा प्रश्न मफिन आणि कपकेक मध्ये नेमका फरक काय ?
मफिन बऱ्यापैकी हेल्दी , अगोड , गव्हाच्या पिठाचा , सुक्या फळांचा वापर केलेला , आणि कधी कधी तिखटमिठाच्या चवीचाही !! याच टेक्सचर दाट आणि थोडं सुकंच असतं आणि ब्रेकफास्ट साठी सर्व होतात 
याउलट कपकेक हे मिनी केकच...गोड , शिवाय वनीला , चॉकोलेट , रेड वेलवेट या स्वादात असतात दिसायला नाजूक ,अंडी आणि बटरमुळे चव विशिष्ट असते  ,जेवणानंतर तोंड गोड करणार डेझर्ट म्हणून हे सर्व होतात , कपकेक वर नेहेमी फ्रॉस्टिंग असतंच !!

चीझ चिली सेवरी मफिन्स 
IMG_6287.JPG
IMG_7430.JPG
IMG_6850.JPG
IMG_6832.jpg
IMG_5496.JPG


बटर क्रीम फ्लॉवर्स कपकेक्स 


Comments

Popular posts from this blog

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

७-माझा बेकिंग प्रवास